मूळ लेख आणि प्रतिसाद - दोन्ही आवडले...
'बायको कशी असावी' या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर देणारा एखादा 'मायकालाल' जन्मलाच तर तो आजन्म अविवाहित रहाणार याची खात्री बाळगावी. रविवार दुपारचा उत्तेजनार्थ रोमान्स आणि उतू जाणारे दूध, प्रमोशनची पार्टी आणि गुरुवारचे व्रत, क्रिकेटची मॅच आणि भजी या केवळ कवीकल्पना समजू नयेत. ( 'वर्ल्डकप - प्रत्येक चार वर्षांनी येणारी एक साडेसाती' या शीर्षकाचा लेख 'मनोगत' वर अजून कसा आला नाही याचे आश्चर्य वाटते!) गोड खाण्याचा आणि मधुमेहाचा तसा फारसा संबंध नाही, पण पश्चातापाची आधीच तयारी असली की लाडवात साखर आहे की 'स्प्लेंडा', याने फारसा फरक पडणार नाही!