जयंतराव, कविता, गजल या बाबतीत आम्हाला 'काळे अक्षर म्हशीसमान' आहे पण ही तुमची गजल वाचताना बापू काणेला सतार ऐकताना जसे झाले तसे आम्हाला काहीतरी आतल्या आत होत होते. 'बऱ्यापैकी आहे का रे हा टुंयटुंयवाला?' असे कुणाला तरी विचारावेसे वाटले.
बढिया!
एक शंका अशी की साकी - म्हणजे मदिरा आणून देणारी तरुणी - असाच अर्थ आहे ना? मग 'जुना तोच साकी' असा पुल्लिंगी उल्लेख कसा? अर्थात इथे 'जुनी तीच साकी' असा बदल केला तरी गजलेच्या दर्जात आणि लयबद्धतेत काही फरक पडत नाही - असे आम्हाला वाटते.