कट्यारेजी,

अंतर्दशा प्राणदशा यांचा विचार करुन गोचरीचे काही फलित देता येऊ शकते असे आपल्याला वाटते का? हा आपला प्रश्न आणि आपले म्हणणे अगदी बरोबर आहे.

गोचरीचे फलित म्हणजे दशा विचाराबरोबरच गोचर ग्रहांची भ्रमणे व त्यांचे कुंडली स्थित ग्रहांबरोबर होणारे योग विचारात घेणे. मात्र फलिते वर्तवतांना ग्रहांच्या परिपाठीय परिणामांच्या बरोबरच अनेक कुंडल्यांच्या अभ्यासातून व स्वानुभावातून मिळालेली परिमाणें अधिक उपयोगी ठरतात. इथेंच मतमतांतराची सुरुवात होते आणि वाद निर्माण होतात. पण तरीदेखील हरकत नाही.
'वादे वादे जायते तत्त्वबोध:' या उक्तीचाही अनुभव घ्यावा हे उत्तम