कित्येक मुस्लिमांचा /खोजांचा आसपास रहाणाऱ्या हिंदू कुटूंबाशी घरोबा असतो हे आपल्या लेखनाने आठवले.
माझ्याही वडिलांचे 'तडवी' आडनावाचे एक सहकारी सणासुदीला आमच्या बरोबर पुरणपोळी पासून मालपुव्या पर्यंत सर्वच पदार्थ वाटून घेत. मोठ्या बहिणीची 'जबीन' नावाची मैत्रीण हक्काने घरी जेवायला येई व बहिणीला आपल्याकडे घेऊन जाई.इम्तियाझ नावाचा एक सहकारी दुसऱ्या बहिणीचा सहकारी होता व त्याचेही आमच्याशी घरोब्याचे संबंध होते.
माझ्या मते बाबरी प्रकरणापासून ह्या संबंधांत बराच फरक पडला आहे. खरंतर हा सुरेख लेख येथे असताना हे लिहायला नको होते पण सर्वच मुस्लीम वाईट (किंवा सगळेच हिंदू चांगले) नसतात हे ओघाने सांगणे आलेच.
चांगल्या लेखाबद्दल अभिनंदन हॅम्लेट....