पुलस्त्ती,
मतल्यातला सानी मिसरा कमजोर आहे. वरच्या ओळीशी संबंधही. २ रा शेर चांगला आहे. अकस्मात आणि मक्ता चांगला आहे.
अकस्मात शेरात हा बदल मला सुचवावासा वाटला-
पहारा असू द्या, पहारा असू द्या
इथे सर्वकाही अकस्मात होते!
पहारा असू द्या च्या द्विरुक्तीने कसा ज़ोम येतो. जागते रहो टाइप ज़ोम:)
तर काही शेरांवर नज़र फिरवल्यास एकंदर अंदाज़ येईल. फ़ोनेटिक्स आणि सफ़ाईकाम अधिक चांगले करता येईल. ज़से मैफल एखाद्या कळशीसारखी रिकामी होती, असे म्हणायचे नसल्यास रिकामी हा शब्द तिथे चपखल नाही. बहुधा मैफलसुनी हवी होती. तसेच मराठीत मैफल योग्य आहे. मैफिल नाही. दर्द-गाणे मराठीत कसेसेच वाटते. पण नाइलाज़ असावा. तमाला कुठे आसरा का मिळावा? किंवा मिळावा कुठे आसरा का तमाला असे कानांना बरे वाटते. आणि नुसते तमा टाळता येत असेल तर का टाळू नये? असो.
तूर्तास एवढेच! पुढच्या गझलेला शुभेच्छा.
चित्तरंजन