संजोपराव,
"खोसला का घोंसला" हा चित्रपट मलाही आवडला, त्यातल्या सर्वांच्या भूमिकांसह. नवीन निश्चलने तर धक्काच दिला, पण (एरवी केवल मॉडेल म्हणून दिसणाऱ्या) पर्वीन डब्बस (चिरौंजीलाल उर्फ़ चेरी) पासून "हर चीज़ को ऑब्जेक्शन लेने"वाला पी.ए., "शैतानसिंग" आणि त्याची न दिसणारी पण आतूनच नमस्ते म्हणणारी अम्मा, सगळेच पसंत पडले. आता हनीमून ट्रॅव्हल्सही बघेन म्हणतो.  
त्या निमित्ताने आपले वर्तमानकाळात स्वागत! भूतकाळातून आता बाहेर येता की नाही ही चिंता लागली होती ती जरा कमी झाली.
आपल्याकडून आणखी भरपूर व सकस लिखाणाची अपेक्षा करतो आहे व आता त्याकडे डोळे लावून बसलो आहे.
दिगम्भा