भाताख्यान छानच! वाचून मला माझे चेन्नैचे वास्तव्य आठवले. केवळ भातप्रेमी होते म्हणून तिथले वास्तव्य सुखकर झाले होते. आता कधी एकदा तिकडे जाऊन टी नगरातल्या 'सरवणा' मध्ये केळीच्या पानावरचा तो भाताचा ढिगारा (अक्षरश:) आधी सांबार, मग कारा कोळम, नंतर रसम आणि शेवटी ताक किंवा दही या  त्यांच्या पारंपारिक क्रमाने  खातेय असे झालेय. सर्व भातप्रेमींनी संढी मिळल्यास याचा जरूर आस्वाद घ्यावा. फक्त जेवताना आजूबाजूला पाहू नये (वाचा सर्वसाक्षींच्या प्रतिसादातील पहिल्या परिच्छेदातील मद्रासचा संदर्भ). आधी वाटायचे की हे लोक इतका भात कसा काय खाऊ शकतात? पण नंतर लवकरच समजले काहीच अवघड नाही. भातप्रेमी असलात की झाले.