प्रथम सर्व प्रतिसादींचे मनापासून आभार!
ऋतू येत होते ऋतू जात होते
जुने ते नव्याने नवे होत होते
------ पुलस्ति!आपले म्हणणे मान्य. पण 'होत होते'ला एक लय आहे असे मला वाटले/वाटते.
जुना तोच साकी जुनी ती सुरा ही
नव्याने पिणारे हजारात होते
---------- चक्रपाणि! 'साकी' ला मराठीत नेमका प्रतिशब्द मलातरी माहीत नाही.'जुना तोच प्याला' असे म्हणता येईल पण त्यात तो 'माहोल' येत नाही. 'सुराही' हे 'सुरा ही' असेही लिहता येईल. 'पसारा'बद्दलची सूचना मान्य, तसा बदल करीत आहे.
---------- संजोपराव! 'साकी' हा मदिरा आणून देणारा सेवक म्हणून पुल्लिंगी संबोधन वापरतात.('साकी' हा 'पोऱ्या' नाही! कारण शायरीत 'साकी'ला मानाचे स्थान आहे व त्याला 'ज्याच्याजवळ मनातली वेदना व्यक्त करता येईल असा मित्र' मानले आहे.) मदिरा आणून देणारी तरूणी-बारबाला' ह्या बंदी-पूर्व काळात महाऱाष्ट्रात असत. ऊर्दू शायरीतील तरूणी 'नजरसे पिलाने'ची मेथड वापरतात.
सदा ती तिची ओढणी आड येते
कधी ना तिच्याशी खुली बात होते
-------------- मिलींद जी ! 'खुली बात'??? खुली बात !! सुचवणीचे स्वागत आहे...
(जयन्ता५२)