सगळे लेख एकत्र वाचले. मध्यंतरापर्यंत. आखातात राहूनही आमच्या वाट्याला वातानुकुलीत ऐशोआरामाचे आयुष्य होते, त्यामुळे हे अशा जीवनाची कधी कल्पनाही केली नव्हती. फारतर, कडक ऊन चुकवायला, भल्या पहाटे उठून आणि सूर्यास्तानंतर जोमाने काम करणारे बांधकाम मजूर आठवतात आणि त्यांच्याबद्दल वाटणारी हळहळ. (हल्ली ती हळहळ भर मध्यरात्री रस्त्यावरील अर्धा अर्धा फूट बर्फ साफ करणाऱ्या महापालिकेच्या कामगारांबद्दल वाटते. घरात बसून हळहळ वाटणे हा सर्वात सोपा प्रकार. )
लेखांची भाषा अत्यंत ओघवती आहे, वाचकांना बांधून ठेवणारी. हे मंध्यंतर तर लाजवाब! पुढे काय होणार याची उत्कंठाही आहेच. या अनुभवांची पुस्तकरूपी बांधणी करण्याचे जरूर मनावर घ्या. पुढील भांगांबद्दल शुभेच्छा आणि उत्सुकता.