सर्वसाक्षी,
परळमधल्या न खाल्लेल्या रोटी सब्जी पासून चीनमध्ये भातभाजीने सोडलेल्या संकष्टीमार्गे सायनला पावसात खाल्लेल्या गरमागरम भज्यांपर्यंतचे खाद्यपुराण ( घाईघाईत 'खाद्यपुरण' लिहीत होतो!) वाचून सकाळी सहा वाजताच भूक लागली! हे 'आठवणीतलं खाणं - भाग १' असू द्या. मग आम्ही आहोतच कुरुंदवाडची बासुंदी, गोकाकचे करदंट, बेळगावी कुंदा आणि मांडे, सांगलीच्या 'कॅफे रॉयल' चा कढी-वडा, 'भगवानदास कंदी' मधली लस्सी आणि 'परांजपे कोल्ड्रिंक हाऊस' मधले गुलकंद आइस्क्रीम , कणसे ढाब्यावरची चिकन करी असल्या पुरवण्या जोडायला...