संगणक शास्त्रामधील इंग्रजी शब्दांचे मराठी प्रतिशब्द वाचल्यावर ग्रीक वाक्याचे लॅटिन भाषांतर वाचण्याइतपत बोध झाला. इंग्रजी शब्दांचा थोडाफार अर्थ संगणकावरील 'मदत' वाचून समजण्याची थोडीफार शक्यता आहे, पण मराठी शब्दांचा अर्थ कुठे शोधायचा? जो विषयच मराठी माध्यमामध्ये उपलब्ध नाही त्यासाठी मराठी शब्दच वापरण्याचा अट्टाहास कशाला?