चक्रपाणि, सन्जोप राव, माधव, वरदा
प्रतिसादाबद्दल अनेक धन्यवाद.

चक्रपाणि
दिलखुलास प्रतिक्रियेबद्दल परत धन्यवाद. खरं सांगू का? अगदी काल घडल्यासारखं वाटतं आहे त्यामुळे जसं घडलं तसं लिहीलं. मांडणीचं म्हणाल तर बरहामध्ये लिहून मग चिकटवले, वेगळे का वाटले कल्पना नाही.


सन्जोप राव, माधव
लिहीताना माझ्याही मनाच्या एका कोपर्‍यात हा विषय होता. कुणालाच हे विसरणे शक्य नाही. आपल्या देशात ज्या दुर्दैवी घटना घडल्या आहेत, त्यांचा हा परीणाम आहे. माझं बालपण हे असं गेलं आणि नंतर बाबरी वगैरेच्या नावावर जे झालं ते पहाताना गोंधळून गेलो. ह्या दोन चित्रांमधली तफावत माझ्या बुद्धीच्या पलीकडची होती. मला वाटतं जगात फक्त दोन जाती असाव्यात, एक आपली माणसांची आणि दुसरी राजकारण्यांची. सत्तेसाठी धर्माचे राजकारण केले आणि त्यात मुंबई, गोध्रा अशा अनेक शहरे होरपळून निघाली. आणि त्याबरोबर बळी गेले हजारो निष्पाप जीव. ह्या प्रकरणात दोषी असलेल्यांना कुठलेही न्यायालय धक्का पोचवू शकत नाही, ही शोकांतिका. धर्मांध लोक सर्वनाशाला कारणीभूत होतात, मग तो धर्म हिंदू असो की मुस्लीम. आणि गंमत म्हणजे कुठल्याही धर्मग्रंथात असे करावे असे लिहीलेले नाही. दयेचा सागर म्हणवल्या जाणार्‍या येशू ख्रिस्ताच्या धर्मासाठी अगणित हत्या झाल्या. मी धार्मिक नाही, पण धर्माच्या 'रक्षणासाठी' अधार्मिक वागणे यातली 'कॉन्ट्राडिक्शन' लोकांना दिसत नसावी का? 'मिले सुर मेरा तुम्हारा' हे फक्त गाण्यापुरतेच का रहाते?
मलाही अशा वेळी गालिब आठवतो.
बस की दुश्वार है हर काम का आंसा होना
आदमी को भी मयस्सर नही इन्सां होना

हॅम्लेट