गझल बरी आहे पण
नकोत नुसत्या अनेक ओळी...
गझल असावी मराठमोळी!
अनेक ओळींचा मराठमोळीशी संबंध लागत नाही.
हसून घेते हळूच चिमटे...
दिसेल जनता वरून भोळी!
दिसेल?
तुझ्या मनीचे रहस्य दिसते
तुला न कळता - तुझ्याच डोळी...
डोळी काहीतरीच वाटते बुवा. पण काफियाच अवघड घेतला आहे. मग काय करणार.
नकाच उमलू पुन्हा कळ्यांनो,
क्षणात येथे सुटेल गोळी...
च भरीचा. हिंसक शेर.
फकीर आम्ही! जगास देण्या -
भरू सुखांनी अखंड झोळी!
देण्या काहीतरीच. शेर चांगला आहे.
एकंदर अक्षरवृत्तात छोटी जमीन आणि तंग काफिया निभावताना दमछाक झाली आहे. तरीही मात्रांच्या जिलब्या घालण्यापेक्षा हे बरे.