कुमारराव,

मानसशी बराचसा सहमत.

मातीमधल्या/मातीमधुनी याव्या ओळी
गझल असावी मराठीमोळी

मतल्यात असेही करता येईल. असो.

हसून घेते हळूच चिमटे...
दिसेल जनता वरून भोळी!

छान. खालच्या ओळीत दिसेलही चालत असावे पण दिसते हवे?

तुझ्या मनीचे रहस्य दिसते
तुला न कळता - तुझ्याच डोळी...

छान.

नकाच उमलू पुन्हा कळ्यांनो,
क्षणात येथे सुटेल गोळी...
कळ्यांचा आणि गोळ्यांचा संबंध काही लागला नाही. कळ्यांचे उमलणे म्हणजे रस्त्यावरचे आंदोलन असा माझा भाबडा समज झाला.

फकीर आम्ही! जगास देण्या -
भरू सुखांनी अखंड झोळी!

कुणाची झोळी? स्वतःची झोळी सुखांनी भरून ती सुखे जगाला द्यायची असे असल्यास ते कसेसेच वाटते.

मला यमके फार आवडली. गझल अजून जोमदार होऊ शकते. कलोअ.
चित्तरंजन