'या बया! काय ही पुरुष मानसं! फुकाची भांडत बसल्यात आन् तरी म्हंतात बाईमानसाची जात भांडखोर.'

हडळ आणि सटवाईचा विजय असो!!

पुढेमागे 'मेड इन परदेश' रक्ताच्या लिपस्टीक आणि अस्सल मनुष्यचामड्याच्या उलट्या चपला हिच्याकडून मागवता येतील ही दूरदृष्टी त्या ठेवून होत्या.

हाहा! मस्तच!!

लेख मस्त आहे! एकदम सही.

ड्रॅक्युलिणबाई ऍडम्स फॅमिलीतील मॉर्टिशिया ऍडम्सशी स्पर्धा करतात वाटते आणि त्या मि. ड्रॅक्युलांना कधीपासून विमानाची गरज लागली? रूप बदलणाऱ्या वटवाघळांचे हे काय झाले? असो तुम्हाला भेटलाच तर ड्रॅक्युलाला म्हणावं की तुझ्या शेजारणीने रेड वाईनची बाटली राखून ठेवली आहे, कधी उपटशील त्याचा नेम नाही म्हणून.   येऊन घेऊन जा.

बाकी, रामसे झक्कास!!!