आनंदघन,
आपण फार महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे.
शंभर वर्षानंतरही मराठी भाषा जिवंत रहायला हवी ह्याबाबत दुमत नसावे. कुठलीही भाषा टिकण्यासाठी त्यात नविन ज्ञानाची अभिव्यक्ती आवश्यक ठरते. विज्ञान, तंत्रज्ञानासह अनेक क्षेत्रातील नविन घडामोडी इंग्रजीत उपलब्ध होतात. हे ज्ञान मराठीत आणण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न झाला नाही तर मराठी क्रमशः मागे पडत केवळ माजघरात बोलल्या जाईल. दुसरा मुद्दा म्हणजे इंग्रजी खरोखर किती लोकांना येते? मग, ज्यांना इंग्रजी येत नाही त्यांनी कोठे जावे बरे? आपली भाषा टिकवणे ही आपलीच जबाबदारी आहे. याचसाठी हा अट्टाहास!
आपली आईची प्रकृती कितीही खालावली तरी आपण तिच्या उपचारासाठी अगदी शर्थीने प्रयत्न करतोच ना? मग, आपल्या मातृभाषेसाठी प्रयत्न करण्यास काय हरकत आहे? पारिभाषिक इंग्रजी शब्दांसाठी कदाचित नेमक्या प्रतिशब्दांबद्दल आपले वेगळे मत असू शकेल. त्याचे स्वागतच आहे. आपले योगदान या उपक्रमासाठी अपेक्षित आहे.