भूतांना भेडसावणारे भयाकारी मानवी गायक जोरजोरात गात आहेत 'झलक दिखलाँ जाँ'..मानवजातीच्या वेडेपणामुळे आपल्या भूतजगतावर आणिबाणीचा प्रसंग आहे.
मॉडर्न म्युजिक कडे असे का हून पाहता बाई?
'तुका कांय करुक आंसां? गप ऱ्हंव!!' देवचार खेकसला
'हांव सांगतंय तुका, सगली वशिल्याची तट्टं आसां! तुका न् माका काय काम ना!' देवचार चिडून म्हणाला.
स्पेशल कोकण टच!
'पन म्यां काय म्हंतो, आपन बोलिवनं धाडूच त्या फ़्वारीनच्या मंडलींना. आन् त्यंच्याकडनं वर्गनी पन घीऊ हजार हजार रुपे.' खवीस अधिकारवाणीने म्हणाला.
देवचार कोकणी आणि खवीस घाटावरचे की देशावरचे? अशी वर्गवारी भूतमंडळींना मान्य आहे का? की मानवजातच असे वर्गीकरण करते. माणसात लिंगभेद, जातीभेद, धर्मभेद वाढीला लागत आहे. त्याची लागण अशी लेखकमंडळी भूतमंडळींनाही करू पाहात आहेत. पुढच्या सभेला ह्याचा निषेध ठराव मांडण्याचा विचार आहे आमचा:))
'त्यांना जिवंत व्हऊदे तिकडं! तू कोनतं लुगडं नेसनार सभेला? म्या ह्येंना पैठनी घ्याया सांगनार हाय.' सटवाई तोंडातली मशेरी सांभाळत म्हणाली.
माणसांच्या बायकांत " त्यांना मरूदे तिकडं" म्हणतात. भूतजातीत जिवंत होणे हिच शिक्षा का?
'शी! दिज विलेज पीपल!! आय डोंट वाँट टू बी विथ देम! हाउ एम्बॅरेसिंग!' कैदाशिणबाई नाक मुरडत पुटपुटल्या आणि त्यांनी पर्समधून छोटीशी रक्ताची ड
कैदाशिणबाई खास सभेसाठी शिवलेला काळाकुट्ट शरारा घालून आल्या होत्या. पण सगळी भूतपुरुषमंडळी ड्रॅक्युलीणबाईकडेच बघत होती. खंत मनात लपवून कैदाशिणबाई ड्रॅक्युलीणबाईला कपड्याकडे इशारा करुनम्हणाल्या, 'युवर ड्रेस इज व्हेरी नाईस.'
कैदाशिणबाई ही टिपीकल शहरी आवृत्ती आहे का? इंग्रजी भाषेचा फवारा, लिपस्टिकचे आवरण, मॉडर्न ड्रेस आणि परदेशी वस्तूंवर डोळा..
हा अज्ञानाचा प्रकाश दूर होऊन ज्ञानाचा अंध:कार पसरवू.'
अगदी माणसाच्या उलटच का बरे असावे सारे ?!