जयंतराव,

हा होता नुसताच निबंध, पण आतापर्यंत लिहिलेल्या काही शोधनिबंधांमुळे यालाही त्याचेच 'स्ट्रक्चर' आपोआपच लाभले आहे, हे तुमच्या या प्रतिसादामुळे लक्षात आलं. म्हणजे बघा ना, ज़सा एखाद्या शोधनिबंधात 'इंट्रोडक्शन ऍंड प्रायर वर्क' नावाचा सेक्शन असतो, तसाच या निबंधाचा पहिला-दुसरा परिच्छेद आहे. शोधनिबंधात ज़सा आपण सिद्धांत/विचार मांडतो, तसाह येथेही शेवटून दुसऱ्या परिच्छेदात मांडला आहे. राहता राहिले 'फ़्युचर वर्क' नि 'रेफ़रन्सेस' हे दोन विभाग! 'फ़्युचर वर्क'चे अज़ून काही निश्चित नाही  आणि तुमच्यासारख्या बाकीच्या सगळ्या 'अनुभवी' प्रतिसाददात्यांकडून 'रेफ़रन्सेस' मिळालेच आहेत  (सगळ्यांनीच ह. घ्या. बरे!)

मनमोकळ्या प्रतिसादाबद्दल सगळ्यांचेच मन:पूर्वक आभार!