आपल्या लेखनाचे सुरूवातीचे भाग न वाचल्याने, एकदमच वाचू ह्या विचाराने वाचन राहूनच जायचे....
शेवटी आज मुहूर्त लागला व सगळे भाग एकाच बैठकीत वाचून काढले.....
लेखन सहज सुंदर आणि ओघवते आहे. उत्सुकतेने व आतुरतेने पटापट सगळे भाग वाचले.
वर्णन वाचताना अजून भाग यावेत असे वाटणारे आहे.
अरबी लोकांच्या संस्कृतीशी एक तोंडओळख करवून दिल्याबद्दल आपले आभार मानावेत तितके थोडेच आहेत.
सुरूवातीच्या प्रत्येक भागाला प्रतिसाद देण्याची खुप इच्छा आहे पण आता वेळ निघून गेल्याने मध्यंतरावर निभावतोय.....