मानसपंत, चित्तोपंत आणि चोखंदळबुवा,
आपणां तिघांशीही सहमत.
चित्तोपंत - तुम्ही सुचलवलेला 'माती'शी संदर्भ आवडला; पण मात्रावृत्तात गझल न लिहिण्याचा मी (अगदी खंदा नसलो तरी यंदा तरी - ह. घ्या.) पुरस्कर्ता आहे; त्यामुळे आणि यती पाळण्याच्या कटाक्षामुळे गझलेत फार ओढाताण झाली आहे.
मतला मला स्वत:ला आवडला होता; पण आपण सर्वांनी म्हटल्याप्रमाणे त्यात दोन ओळींतला संदर्भ स्पष्ट होत नाही हे खरं आहे. नकोत परक्या अनेक ओळी - हा एक बदल सुचतोय. अर्थात यापेक्षा चांगलंही काहीतरी होऊ शकेल.
कळ्या - गोळ्यांचा संदर्भ काश्मीरच्या पार्श्वभूमीवर मला द्यायचा होता. आणि पु. लं. च्या 'खुशीच्या फकिरी'चा कुठे तरी मक्ता जुळवताना विचार केला गेला असावा; पण आपल्या प्रतिसादांवरून हे सगळं नीट मांडलं गेलं नाहीये हे जाणवतंय. मनमोकळ्या प्रतिसादांबद्दल धन्यवाद!
- कुमार