आरती प्रभूंची एक सुंदर कविता- (पुस्तकाचं नाव माहिती नाही. अलीकडे हृदयनाथांनी संगीतबद्धही केली आहे आणि लता मंगेशकरांनी गायली आहे); पूर्वी डॉ. मनोज भाटवडेकरांनीही त्याला अप्रतिम चाल लावली होती - ती अजूनही मनात घोळते आहे. गपनी गपसां गंरें गंरें सांनीपगपनी सां अशी सुरावट त्यात होती.
ही निकामी आढ्यता का? - दाद द्या अन् शुद्ध व्हा!
सूर आम्ही चोरितो का? चोरिता का वाहवा? शुद्ध व्हा!
मैफिलीची साथ आम्हां दैवयोगे लाभली
न्या तुम्ही गाणे घराला -फूल किंवा पाकळी
दाद देणे हे असे गाण्याहुन आहे दुर्घट
गुंफता गजरे दवाचे आणि वायूचे घट
- कुमार