माफीजी,
अप्रतिम विडंबन - अक्षरगणवृत्त आणि यती पाळून केलेलं असूनही. अभिनंदन!

मिटून घे तू हळूच खिडकी
बघेल जनता उगाच भोळी

तुझ्या मनीचे रहस्य दिसते
अनेक बोके तुझ्याच बोळी

नकाच तापू पुन्हा तव्यांनो
क्षणात येथे फुगेल पोळी

कवीच आम्ही! जगास छळण्या
भरू फुकाच्या अखंड ओळी

सगळेच शेर खूप आवडले.

- कुमार