स्त्री म्हणजे मल्लिकाची मादकता (शेरावतांची मल्लिका)
स्त्री म्हणजे कॅथरिनची सत्तालोलुपता (कॅथरिन द ग्रेट, रशियाची साम्राज्ञी जिने सत्तेसाठी आपल्या अर्धवट नवऱ्याचा काटा काढल्याचा प्रवाद आहे.)

स्त्री म्हणजे आनंदीबाईची आकांक्षता (आकांक्षता - मला माफ करा असं काहीतरी लिहिल्याबद्दल!)
स्त्री म्हणजे माताहारीची चाणाक्षता (स्त्री हेर)

स्त्री म्हणजे अंजलीची भेदकता (अंजली भागवत)
स्त्री म्हणजे उषाची चपळता (पी टी उषा)

स्त्री म्हणजे पद्मिनीची कणखरता
स्त्री म्हणजे सुनिताची बुद्धीमत्ता (सुनिता विल्यम्स)

मला कवितेतील ओ की ठो कळत नाही, माझं मराठीही जेमतेमच आहे तेव्हा वरील ओळींना काव्य म्हणू नये. तरीही लिहिण्याचा हेतू इतकाच की बायकांकडे वेगळ्या नजरेतूनही पहा हो, चालतं त्यांना!