क्रमांक १ : मदत करण्याआधी माणूस कुठला आहे ते पहावे आणि मग मदत करावी का? समजा एखादा अपघात झाला असेल तर?
क्रमांक ३ : पत्ता कळल्यावर शिवसेना काय करणार? त्याच्या घरी जाऊन जाळपोळ, मारहाण?
क्रमांक ९ : मला इडली, डोसा, उत्तप्पा भयानक आवडतात. मग मी काय करू? (समजा मी बंगलोरमध्ये गेलो, तर काय करू?) मला रस्त्यावरील पाणीपुरी, भेळपुरी, मक्याची कणसे हे पदार्थही प्रचंड आवडतात. त्यांचे काय?
क्रमांक ११ : म्हणजे मी इतर प्रांतियांशी उर्मटपणे वागू शकतो का?

माझे बरेच मित्र-मैत्रिणी बंगलोरमध्ये नोकरी करतात. त्यांच्याशी तिथल्या स्थानिक लोकांनी असा व्यवहार केला तर काय होईल? किंबहुना देशातील प्रत्येक प्रांतात परप्रांतियांना अशी वागणूक मिळाली तर?

हॅम्लेट