अरूणराव....
लेख आवडला,
जेव्हा आपल्या स्वतःसाठी आपण प्रयत्न करूनही यश मिळत नाही (लक्षात घ्या; प्रयत्न करूनही हे म्हणतोय !) तेव्हा एक मानसीक परिस्थिती निर्माण होते.... हेच दुसऱ्याचे उदाहरण जेव्हा डोळ्यासमोर येते व परिस्थिती उलट असते म्हणजे त्या गृहस्थाने प्रयत्न न करता यश येणे हे द्योतक कशाचे ?
नशीब ? कुंडली ?? त्याच्यावर कोणाची तरी कृपा ??? नेमके काय ?

माझेच उदाहरण सांगतो- गेल्या दोन/अडीच वर्षांत मी जी कामे रोजची असतात (व्यवसाय, घरची किंवा इतर ) तीच वेळेवर व त्याच आत्मीयतेने करतोय, परंतु सुरळीत चाललेले कुठलेही काम अचानक बिघडतेय.
गेली दोन वर्ष सहन केल्यावर कोणीतरी सांगीतले की "सिंह राशीला साडेसाती सुरू आहे, शनीची उपासना करा" उगीच भानगड नको म्हणून तेही करून बघीतले...
परिणाम अगदी उलटे झाले- विश्वास नाही ठेवणार आपण पण प्रत्येक कार्यात अडथळे येउ लागले. जी कामे नेहमी सुरळीतपणे पार पडत त्यात विघ्ने येऊ लागली.
दुसऱ्याने सांगीतले "अरे, शनिला कधीच कृपादृष्टी नसते- त्याची उपासना करून तू त्याची वक्र दृष्टी स्वतःकडे ओढवून घेतलीस तेव्हा सगळ्या उपासना बंद कर" 
असेही मला ती उपासना करणे जरा कठीणच जायचे म्हणून लगेच बंद केली. जरा परिस्थिती सुधारली.....
म्हणजे शनीला कृपादृष्टी असते की नाही ? की जेथे/ज्याच्यावर त्याची दृष्टी पडते त्याचे "कल्याण" होते ?

दुसरे गांगुलीचे उदाहरण- त्याची हकालपट्टी व्हायच्या वेळी तो जसा खेळायचा व आज जसा खेळतोय त्या पद्धतीत जमीन आस्मानाचे अंतर नाही पण आज यश येतेय !

ग्रह मानवी आयुष्यावर काय परिणाम करतात ?
पौर्णीमे किंवा अमावस्येलाच वेडसर लोकांच्या वागण्यात फरक का पडतो ?
मेडीकली हे ऑब्जर्व्ह केले आहे की, मानवाच्या लैंगीक गरजाही अमावस्या ते पौर्णीमा व उलट अश्या वेगवेगळ्या असतात.... हे विज्ञान आहे का ?

दुसरे मानवावर जर ग्रहांचा परिणाम होतो तर इतर प्राणीमात्रांवरही हा होतो का ?
प्राणीमात्रांवर होत असल्यास त्यांच्या कुंडल्या काढता येऊन त्यावर संशोधन शक्य आहे का ?
भारताची (राष्ट्र म्हणून) भारतिय टिमची किंवा अवकाशात सोडल्या जाणाऱ्या सॅटॅलाइट ची कुंडली मांडण्यात येते त्यात कितपत अर्थ आहे ?

अगदी बेसीक अश्या काही गोष्टी आपणांस ज्ञात असल्यास येथे देण्याची कृपा करावी.