बापरे! अशासाठी की या चित्रपटावर तुम्ही इतका सखोल विचार केला आहे याचं कौतुक वाटलं. मी पाहिलेला नाही, परंतु डस्टिन हॉफमनसाठी जरूर पाहिन आणि विषयही मस्तच आहे. हॉफमन माझा आवडता अभिनेता आहे, त्याच्या अभिनयाला नैसर्गिकतेचे वरदान आहे (क्रेमर व. क्रेमर). रनअवे ज्युरी या सिनेमात त्याचा अभिनय (अंडरप्ले) अतिशय आवडला होता. (तरीही तो हिरो म्हणून फारच बावळट [रेन मॅनचा प्रभाव] आणि मजेशीर [मीट द फॉकर्सचा प्रभाव] दिसतो हा असं मला मनापासून वाटतं. ) जाऊ दे! प्रत्येक सिनेमा आठवायला जात नाही त्यामानाने रेडफोर्ड हा मला अतिशय थंड डोक्याचा आणि भेदक नजरेचा नायक वाटतो. (ही इज कूऽऽल! वगैरे वगैरे) पण दोघेही अतिशय सशक्त नायक आहेत.
कथेची, दिग्दर्शकाची पार्श्वभूमी सांगून, कॅमेरा आणि प्रकाशयोजनेबद्दल तसेच इतरही माहिती देण्यावरून तुम्ही बहुधा अवांतर वाचन केलेले आहे असे वाटले, त्यामुळे परीक्षणाला एक वेगळी झिलई चढली आहे.
सुरेख! परीक्षण आवडलं. चित्रपट पाहते लवकरच.