चित्त,
<सल कुठलाही जपून कोणा स्मरण्यापेक्षा
हेच बरे विस्मरून जावे आनंदाने>
हा तर सुखी जीवनाचा मूलमंत्र!
<जाण्याची घटका आली की अवतीभवती
जिवलग गोळा करून जावे आनंदाने>
हे वाचताना 'आनंद' आठवला आणि तळटीपेचे प्रयोजन लक्षात आले. फारच सुंदर.
अवांतर : काल रात्री प्रतिसादाचे सर्व प्रयत्न व्यर्थ ठरले:) सातत्याने त्रुटीसंदेश झळकत होता.
आले मनोगतच्या मना, तेथे मनोगतीचे चालेना; दुसरे काय?