शपथेंत खालील कलम हवे.
मराठी माणसांनी आपल्या सदसद्विवेकबुद्धीला पटणाऱ्या मूलभूत गोष्टींना चिकटून राहावे. त्याबाबतींत कधीही, कशासाठीही व कुणासाठीही तडजोडीची भूमिका घेऊ नये. त्यासाठी आयुष्य पणाला लावायची व वेळ पडल्यास मरण्याचीही तयारी ठेवावी. याबाबतींत नुकतेच एक उदाहरण वाचनांत आले. एका गृहस्थाला महाराष्ट्रांत दुचाकीच्या नंबरप्लेटवर मराठी आकड्यांत नंबर लिहायला हरकत असू नये असे प्रामाणिकपणे वाटत होते. त्याने आपल्या वाहनाच्या बाबतींत तसे केले. त्याबद्दल त्याला दंड भरावा लागला. त्याने "आयुष्यभर दंड भरावा लागला तरी चालेल पण नंबरप्लेटवर इंग्रजी आकडे लिहिणार नाही" असा आपला निश्चय जाहीर केला आहे.