गझल उत्तम आहे पण आनंदाने रदीफ अनावश्यक आहे. आनंदाने की कसे आणि आनंदाने की दुसऱ्या कोणी हे वाचकाला ठरवू देत ना. तुम्ही कशाला ठरवता. वरच्या ओळीतले भरीचे शब्द कल्पना आणि खालच्या ओळीतला भरीचा रदीफ काढून टाकला तर

हसता-हसता सरून जावे
मागे केवळ उरून जावे

सर्व चेहरे जिवंत व्हावे
अकस्मात घर भरून जावे 

जाशी तेथे तुझ्याच मागे
बोट सुखाचे धरून जावे

पुन्हा मनाने अवखळ व्हावे
घरात यावे, घरून जावे

घरात जाणे अशक्य होता
नुसते दारावरून जावे

मिळालीच तर अशी मिळावी
जिला पाहुनी झुरून जावे

सल कुठलाही जपण्यापेक्षा
हेच बरे विस्मरून जावे

दोन घडींच्या भेटी यावे
जन्मासाठी  ठरून जावे

घटका येता अवतीभवती
जिवलग गोळा करून जावे

असे केल्यावर ही गझल छानछान वाटत नसेल तर आनंदाने ह्या लुसलुशीत शब्दाने केलेली जादू एवढे सोडून मूळ गझलेत काही खास राहत नाही बुवा.