मतल्यातला सानी मिसरा कमजोर आहे - एकदम कबूल. तरही गझल असल्यामुळे, जमीन वैभवची आहे. फुला, पानांची उदा. त्याने दिलीच होती, त्यामुळे तीही वापरता आली नाहीत मतला खरच खूप कठीण गेला.
अकस्मात बद्दल तुमची सूचनेमागची भूमिका आणि तर्क समजला.. पण तरी त्या द्विरुक्तीतून - "जरी सध्या सर्व आलबेल असलं तरी" हे पोचत नाही असं वाटतं. पण अजून विचार करतो.
तमाला - एकदम पटले! "तमा" अशी अधांतरी रचना टाळता आली असती. आणि टाळायला हवी होती.
मैफ़िल - मैफ़ल च हवे हे पटले. पुन्हा अशा चुका टाळण्याचा प्रयत्न करीन. "दर्द" ऐवजी माझ्याकडे "आर्त" हा पर्याय होता. नाईलाज नव्हता. पण "दर्द-गाणे" असेच ठेवावे असे मला आणि कार्यशाळेच्या mentor चेही मत पडले. "रिकामी" वरचा तुमचा आक्षेप समजला.
तुम्ही, वैभव सर्वजण वेळ काढून सूचना, मार्गदर्शन करीत आहात. मनापासून आभार! चुका टाळून अधिकाधिक निर्दोष, अर्थपूर्ण लिहिण्याचा प्रयत्न करीत राहीन.