माझा अनुभव असा की, दोन गुजराती, दोन (कुठल्याही प्रांतातील) दाक्षिणात्य, दोन पंजाबी, दोन चिनी एकमेकांना भेटले की आपसूकच आपल्या भाषेत बोलणे चालू करतात. पण दोन मराठी व्यक्ति भेटल्या तर बहुदा त्या इंग्रजी अथवा हिंदीतून संभाषण करतात. आणि हे विशेषत: पुण्या-मुंबईच्या मंडळीबाबत जास्त दिसून येते. ह्यामागील कारण काय असावे? केवळ इंग्रजी माध्यमातून शिकल्याने म्हटले तर दाक्षिणात्यांच्या बाबतीत तसं का होत नाही? आणि मग ही हिंदी कुठून येते मध्येच? का हा सर्व आपणा मराठी बांधवांचा स्वतःबद्दलचा अभिमान कमी असण्याचा परिणाम?