सन्जोपराव,
राज कपूरच्या अनेकानेक आठवणींना उजाळा देऊन त्या लयास गेलेल्या, कधीही न परतण्याऱ्या काळाच्या आठवणी ताज्या केल्याबद्दल मन:पूर्वक आभार. तुमचा लेख खूप आवडला हे वेगळं काय सांगायचं? फक्त तुमच्या पहिल्या वाक्याशी मी असहमत आहे. शोमन होण्याआधीचा राज नट म्हणून, दिग्दर्शक म्हणून मला मनापासून आवडतो. संवेदनशीलतेची जागा स्त्री-देहाच्या आरस्पानी, अनंगरंगी प्रदर्शनाने भरून काढू पाहणारा राज अजिबात आवडत नाही.