सन्जोपराव,
राजकपूरसारख्या प्रगल्भ दिग्दर्शकाचा व नटाच्या कार्याविषयी आपण घेतलेला आढावा खरोखरच उल्लेखनीय आहे. आपली लेखनशैली आपल्या मतांना योग्य न्याय देउन जाते.
कोणत्याही महान (असो वा सामान्य) माणसाची ऋण बाजू असतेच, ती आपल्याला त्याच्या 'राम तेरी गंगा मैली' , 'सत्यम शिवम सुंदरम' , 'बॉबी' सारख्या चित्रपटातून दिसते. पण असेही वाटते, राज कपूरला काहीतरी वेगळा प्रयत्न करून पहायचा असेल, म्हणून असे चित्रपट काढले असतील. काळानुसार त्याला चित्रपट विषयामध्ये तसेच सादरीकरणामध्ये बदल करावे वाटले असतील. असे चित्रपट काढण्याआधीच्या काळात राज कपूर रशियास भेट देउन आला होता, तिकडील चित्रपटातील मुक्त लैंगिकतेचे प्रदर्शन राज कपूरला इकडे आणावे वाटले असेल. भारतीयांच्या कुटुंब, विनोद, सर्व काहि आलबेल अश्या प्रकारचे चित्रपट बघण्याच्या चवीला त्याला बदलायचे म्हणुनही असेल का?
मराठित पण अशा प्रकारचा एक नट-दिग्दर्शक होउन गेला- दादा कोंडके. दादांचे पण सुरुवतीचे चित्रपट(स्वत: दिग्दर्शित असोत वा नसोत) उच्च दर्जाचे होते. उदा. तांबडी माती, एकटा जीव सदाशिव...इ. पण नंतरच्या काळात मात्र त्यांनी द्वयर्थी संवाद असलेल्या चित्रपटांचा सपाटाच लावला. आजही ग्रामीण भागात दादांचे चित्रपट 'हाऊसफुल्ल' चालतात. यातील बऱ्याच लोकांना दादांच्या उत्तम कलाकृतींची माहितिही नसेल. दादांचे स्वत:चे मत होते कि, 'लोकांनी माझे चित्रपट बघावे, मनमुराद हसावे, टेन्शन विसरून चित्रपट एन्जॉय करावा'. दादांना का बरे असे चित्रपट काढावे वाटले असेल?
याचे उत्तर आपल्याला परलोकात गेल्यावरच मिळेल. तोपर्यंत आपण त्यांच्या आपल्यासाठी योग्य त्या चित्रपटांचा आस्वाद घेउ!
राज कपूरविषयी आणखी एक गोष्ट सांगावीशी वाटते, तो एक अतिशय मेहनती होता. चित्रपटाच्या प्रत्येक अंगावर तो प्रचंड मेहनत घ्यायचा. गाणी कंपोज व ध्वनिमुद्रित करताना, चित्रपटाचे संकलन करताना, पार्श्वध्वनी देताना तो स्वत: उपस्थित असायचा.
काहीहि असो... राज कपूर व दादा कोंडके यांना माझ्यासारख्या चित्रपट चाहत्याचा सलाम!