हा फार छान लेख लिहिल्याबद्दल धन्यवाद, सन्जोप!
'मेरा नाम जोकर'चा उल्लेख रहुन गेला तो अनवधाने, की तो तुम्हाला आवडला नाही म्हणून? त्याचा चौथा भाग काढून टाकला, तर तो एक सुंदर चित्रपट होता. त्यांतील गाण्यांचं चित्रिकरण तर poetic होतं. अत्यंत कौशल्यपूर्वक गाण्याचं चित्रिकरण करणाऱ्यांमधे राज, गुरु दत्त व विजय आनंद ह्यांची गणना होते. मे. ना. जो. प्रमाणेच अजून एक चित्रपट आठवतो, ज्या.त त्यांचं गाण्याचं चित्रिकरण नितांत सुंदर आहे--- 'प्रेमरोग' मधील 'ये गलिया, ये चौबारा' ह्या गाण्यांत लग्नघर दाखवले आहे. पुढे (foreground ला, अशा अर्थाने) नायिका व नायक आहेत. पण मागे जी लग्नघराची लगबग, तयारी वगैरे चाललेली दाखवली आहे, तो एका प्रकारे स्क्रीनवर movements किती सुरेख असू शकतात, त्याचा सुंदर वस्तूपाठच आहे.
राज कपूर ही एक संस्था होती (institution). त्यांनी अत्यंत गुणी कलावंत आपल्या भोवती जमवले--- शंकर-जयकिशन, शैलेंद्र, हसरत जयपूरी, राघू कर्मकार, ही काही महत्त्वाची नावे. लताबाईंना बरसातसाठी गाण्यास पाचारण करण्याचं श्रेयही राजचंच.
जाता जाता, एक व्यक्ति म्हणून राज विक्षिप्त होता. शैलेंद्रला 'तीसरी कसम'च्या वेळी त्याने खूप त्रास दिला. सरळ मनाच्या शैलेंद्रला हे अनपेक्षित असल्याने तो खचून गेला. अलिकडे विजय तें. नि त्याच्याबरोबर झालेल्या भेटीचा सविस्तर वृतांत लिहिला होता, तो वाचण्यासारखा आहे.