रावसाहेब, लेखाचे शीर्षक आणि लेख आवडला. विनायकरावांचा प्रतिसादही. राज कपूरला संगीताची, लोकगीतांची उत्तम जाण होती. त्याबाबतीत तो रसीला होता. अनेक प्रसिद्ध पाकिस्तानी कलावंत जेव्हा भारतात माहीतही नव्हते तेव्हा राज कपूरकडे गाऊन गेले. आपला चित्रपट चालणार नाही अशी भीती त्याला अखेर जास्तच सतावत असावी. म्हणूनच ती ओली गाणी, अंगप्रदर्शन कथानकाला गरज नसताना अनेकदा घुसडलेले दिसते. सत्यं शिवं सुदरं सारख्या चित्रपटातली गाणी किती सुंदर आहेत. पण अनेकांसाठी तो चित्रपट केवळ झीनतमुळे अजरामर झाला आहे. अखेरच्या काळात कवीमनाचा बाजारूपणा जरा जास्तच वाढला होता असे दिसते.