इंग्रजीमध्ये टिकिट् असा उच्चार आहे.  हिंदीमध्ये टिकट असा शब्द वापरतात.  मराठीमध्ये रुळलेला शब्द म्हणजे तिकीट(अनेकवचन तिकिटे).  प्रत्येक परकीय शब्दाला मराठी शब्द सुचवण्याचा प्रयत्न सावरकरांनी केला होता. तो अयशस्वी झाला. त्यांचे शब्द: विकान(दुकान), खाद्यालय(हॉटेल), व्यतिरिक्त(शिवाय, खेरीज), प्रशाला(हायस्कूल), गाळा(फ्लॅट, ब्लॉक),  महाविद्यालय(कॉलेज).  यातील बरेच शब्द लेखी व्यवहारात वापरतात, पण बोलीभाषेत मूळ परकीय शब्दच बोलले जातात.  त्यामुळे भाषाशुद्धी म्हणजे परकीय शब्दांची हकालपट्टी करून त्यांच्याऐवजी(जागी?) अवघड मराठी शब्द निर्माण करणे ही कल्पना आता बाद(त्याज्य?) झाली आहे.  त्याउलट परकीय शब्द उच्चारायला सोपे असतील तर जसेच्यातसे आणि अवघड असतील त्याचे सोपे मराठीकरण करणे रास्त(उचित?) आहे. शुद्ध संस्कृतप्रचुर मराठीमध्ये तयार केलेला पारिभाषिक शब्द वापरायला सोपा असेल तर तो आपोआप रूढ होतो.

आता स्टेपलिंग//स्टेपलरसाठी एक अवघड शब्द सुचवतो.  तारटाचणी/तारटाचण्या मारणे. // तारटाच्या. (टोचणारा तो टोच्या, टाचणारा टाच्या.)  कसा वाटतो? रूढ व्हायला हरकत नाही.