माधव काका,
कथा, कथेचा आशय मनापासून आवडला. मामा, मामीं ना जे जीवनाचे मर्म कळाले आहे आणि इतर प्रतिसाद इथे आहेत ते पण पटते पण ह्यावर कडी केली ती तुमच्या शेवटच्या विचाराने की "आईला आणायचे नाही असा दृढनिश्चय करून मी गाडी दामटवली....... ........न जाणो तीला येथले वातावरण आवडल्यास मी माझ्या मातृप्रेमाला पारखा झालो असतो ! ".
मला सुद्धा हेच म्हणायचे आहे, घरात पैसा अफाट असताना ज्या माझ्या आई वडीलांनी मला माणूस म्हणून घडवण्या साठी स्वतः कधी तो न उपभोगता साधे पणाने राहिले त्यांच्या शिवाय दूर राहिने मला तर जमणार नाहीच.