सावरकरांचा उपक्रम अयशस्वी झाला असे म्हणणे धाडसाचे ठरेल. उलट सावरकरांनी आपल्यासाठी एक मापदंड ठेवला आहे आणि त्यांच्या कल्पनेप्रमाणे प्रयत्न केल्यास यशाची खात्री हमखास आहेच आहे.

आता शब्दसाधनेच्या भूमिकेबद्दल. मराठीत अनेक परकिय शब्द आहेत या बद्दल दुमत नाही. आमचा प्रयत्न सध्यातरी आंग्लशब्दांच्या पर्यंत सीमीत ठेवला गेला आहे.

अजून एक, शब्दांचा कारखाना ( निर्मिती) चालू राहिली पाहिजे, चांगले शब्द स्वीकारले जातील आणि दुबळे शब्द नाकारले जातील. फारतर असे म्हणाना, कर्मावर माझा आधिकार आहे, यशापशावर त्याचा...

जय मराठी.