मला राजकपूर नट म्हणून जास्त आवडतो. दिग्दर्शक म्हणून कमी. दुसरे म्हणजे त्याची सामान्य माणसाच्या मनात जी प्रतिम तयार झाली त्यात सगळ्यात मोठा वाटा कवी शैलेंद्रने लिहिलेल्या गाण्यांचा आहे.

शंभर टक्के सहमत आहे. तसेच शंकर-जयकिशन (दत्ताराम सॅबस्टिअनसकट), हसरत जयपुरींचाही - अपवाद म्हणून सलील चौधरींचाही (जागते रहो). राज कपूर आर.के. बाहेरच्या चित्रपटात फारसा मन लावून काम करत नसे, असा त्याच्यावर आरोप केला जातो, पण त्यात काही तथ्य नाही, बासुदा, हृषीदा, राजा नवाथे यांनी राज कपूरच्या गुणांचा पुरेपूर वापर केला आहे (अनुक्रमे तीसरी कसम, अनाडी आणि चोरी चोरी)
मला वाटते राजकपूरच्या चित्रपटाचे यश हे त्याच्या संघाचे यश आहे.
या संघाचा मुखिया म्हणून राज कपूरने बिनतोड काम केले. 'ढोर मेहनत' हा शब्द चपखल बसावा असे त्याचे कष्ट असायचे. कलाकारांकडून उत्तमोत्तम ते काढून घेण्याची त्याची हातोटीही अफलातून. सईद जाफरीकडून 'राम तेरी गंगा मैली' मध्ये त्याने काय काम करून घेतलंय!

त्याचा सर्वात न आवडलेला चित्रपट म्हणजे गोपीचंद जासूस.
'कल आज और कल'नंतरचा राज कपूर बघण्याचा काय, आठवण्याचाही प्रयत्न करू नये!

'मेरा नाम जोकर'चा उल्लेख रहुन गेला तो अनवधाने, की तो तुम्हाला आवडला नाही म्हणून? 
'जोकर' शिवाय राज कपूरविषयीचे लेखन अपुरे आहे. त्यामुळे हा अनुल्लेख माझ्या विस्मरणशक्तीवर टाकावा! दूरदर्शनवर घेतलेल्या एका मुलाखतीत राज कपूरने सांगितले होते की 'जोकर' आणि 'जागते रहो' हे चित्रपट चालले नाहीत, पण वैयक्तिकरीत्या ते त्याला अधिक जवळ होते. गाण्याच्या चित्रीकरणाचीही राज कपूरची खासियत होती. 'रम्मया वत्त्तावय्या', 'जाने कहां गये वो दिन' आणि हो, 'दोस्त दोस्त ना रहा' ही सगळीच गाणी आठवून पहावी!

आपल्या सर्वांच्या प्रतिसादाबद्दल आभारी आहे.