प्रतिसादाबद्दल सर्वांचे अनेक धन्यवाद.
प्रियाली
थँक्स फॉर द काईंड वर्ड्स. :-)
जे चित्रपट मला आवडतात त्यांच्याविषयी माहीती गोळा करायलाही आवडते. आणि कॅमेरा वगैरेचे सांगायचे तर लहानपणी मला चित्रपट दिग्दर्शक व्हायचे होते :-) ते शक्य नाही हे (सुदैवाने) लवकरच लक्षात आले पण तेव्हापासून चित्रपट बघताना नेहेमी कॅमेऱ्याच्या दृष्टीकोनातून बघायची सवय लागली.
रेडफोर्ड थंड डोक्याचा आहेच. मला वाटते ह्या चित्रपटात अभिनेते आणि त्यांच्या भूमिका यातही बरेच साम्य आहे.
डस्टीन हॉफमन मलाही आवडतो आणि ह्या चित्रपटात तो आणि रेडफोर्ड यांचे परस्परविरोधी स्वभाव एकमेकांना पूरक ठरतात. क्रेमर व. क्रेमर मध्ये मेरिल स्ट्रीप आणि हॉफमन यांची जुगलबंदी अफलातून झाली आहे. रनअवे ज्यूरी मी पाहीला नाही, पण बघायला हवा लवकरच. दुसरा मला प्रचंड आवडणारा माणूस म्हणजे अल पचिनो. गॉडफादरमध्ये मला तो ब्रँडोपेक्षा जास्त प्रभावी वाटला.
संजोप राव
हा चित्रपट मला कधीही कुठल्याही चॅनेलवर चालू असलेला दिसला नाही. काही काही चित्रपटांचे त्यांना वावडे आहे की काय कोण जाणे. (सत्यजित रेंना ऑस्कर मिळाल्यावर दूरदर्शनला त्यांची आठवण झाली.) पण दुकानात किंवा व्हिडीयो लायब्ररीत हा चित्रपट नक्कीच उपलब्ध आहे.
सुमीत
स्पाय गेम पाहीला आहे, पण बुच कॅसडी ऍण्ड सनडान्स कीड बघायचा आहे. स्पाय गेम छान आहे.
द्वारकानाथ कलंत्री
जरूर. मलाही आवडेल.
हॅम्लेट