१. बैठकीच्या खोलीची रचना(संकल्पना)
२. बुटाळ्यात शिरस्त्राण, वर्षावस्त्र, रद्दी कागद वगैरे
३. बुटाळ्यात प्लास्टिकअवगुंठित जाळी लावता येते.
४. आवडीप्रमाणे बनवून घेण्यासारखी आणखी एक गोष्ट म्हणजे दूरदर्शन मंजूषा.
५. या मंजूषेत संगीत ऐकण्याची तबकड्यासकट सर्व साधने, आणि शोभिवंत वस्तू ठेवता येतात.
६. बाजूलाच असलेले दीपप्रज्वलित मनोरे छान दिसतात.
७. सोफ़ा(किंवा कोच) एक, दोन किंवा तिघाजणांसाठीचा असावा.
८. पडद्याच्या रंगरूपाचा विचार करावा. पडदे दिमाखदार असावेत.
९. पडदे हलवायला कड्या आहेत.
१०. बैठकीच्या खोलीच्या सौंदर्यात पडद्यांचा मोठा सहभाग असतो.
११. तसा सौदर्यासाठी मिथ्थ्याछताचा विचार पण करूया.
१२. साहेबांच्या शयनगृहात कपाटे, प्रसाधनामंच. दुहेरी शयनमंचक व लिहिण्यासाठी एक मेज हवे.
१३. पोटमाळा असल्यास उत्तम.
१४. ओढखण आणि ढकलगाडी हवी.
१५. आपले घर लोकांच्या डोळ्यावर येईल इतके भपकेदार नको.