बहुतांशी सुचवलेल्या पर्यायी शब्दांमध्ये संस्कृतप्रचुर शब्द आढळतात‌. स्वा.सावरकरांनी सुचवलेल्या शब्दांमध्येही संस्कृतप्रचुर शब्दांचाच भरणा होता त्यामुळे बहुजनसमाज ते शब्द आत्मसात करू शकला नाही आणि हीच ते शब्द रूढ होण्यातील अडचण आहे. ज्ञानेश्वरांनी श्रीमद्भगवद्गीता ज्ञानेश्वरीच्या रूपाने मराठीत आणली  किंवा विनोबानी गीताई आपल्या आईसाठी लिहिली ( प्रत्यक्षात त्यांच्या आईला ती पहायला मिळालीच नाही ) याचाच अर्थ शक्यतो शुद्ध मराठीत पर्याय उपलब्ध होणे आवश्यक आहे. याचा अर्थ श्री कलंत्री यांची तळमळ अयोग्य आहे असे नाही पण इंग्रजीऐवजी संस्कृत म्हणजे  पुन्हा ती मराठी नाहीच एवढे निश्चित.मराठी किंवा कोणत्याही अन्य भारतीय भाषेत एका शब्दापासून वेगवेगळे शब्द करण्याची सोय उपलब्ध नाही इतर भारतीय भाषांविषयी माझे विधान बरोबर असेलच असे नाही )जी संस्कृत अथवा इंग्लिश मध्ये आहे.त्यामुळे दुसऱ्या भाषेतील शब्द इंग्रजीमध्ये रूपे धारण करू शकतात आणि त्यामुळेच ती भाषा समृद्ध झाली आहे   असे काही शब्द मराठीतही बनलेले दाखवता येतील पण संस्कृतचा आधार घेतल्याशिवाय मराठी प्रतिशब्द बनवणे अवघड जाते हा माझा अनुभव आहे.मी महाराष्ट्र ग्रंथ निर्मिती मंडळासाठी एक अभियांत्रिकि विषयावरील पुस्तक लिहिले त्यावेळी मला असा अनुभव आला. म्हणजे आपल्याला एकतर आंग्ल भाषा तरी वापरली पाहिजे किंवा संस्कृत तरी म्हणजे शेवटी मराठी नाहीच.