सन्जोप राव,

अतिशय सुंदर लेख लिहिलात आपण. मला व्यक्तीशः राज कपूर फारसा आवडत नाही. पण आपला लेख मात्र खूप आवडला. मी "मेरा नाम जोकर" पाहिला आणि राज कपूरच्या दिग्दर्शन कौशल्याविषयी माझे मत तितकेसे चांगले झाले नाही. खूपच रटाळ आणि भरकटलेला चित्रपट होता तो. पण नट्यांचे अंगप्रदर्शन दाखविण्याची राज कपूरची हौस मात्र खूप दांडगी होती. मग त्याला "कलात्मक" वगैरे म्हणून त्याने तो प्रकार खपविला ही! "सत्यम शिवम सुंदरम" मधले अंगप्रदर्शन किंवा "राम तेरी गंगा मैली" मधले अंगप्रदर्शन कुठल्या प्रकारे "कलात्मक" होते हे तो देव किंवा राज कपूरच जाणे! मुळात अंगप्रदर्शन हे कलात्मक कसे असते हेच म्या बापड्याला कळलेले नाही. असो.

--समीर