ठीक आहे पण

ऋतू येत होते ऋतू जात होते
हवामान पंडीत कोड्यात होते
शेर ठीक पण पंडीत अशुद्ध.

किती गोठले शब्द ह्यांचे प्रवाही!
नवे काय त्या हिवाळ्यात होते?
वरची ओळ चांगल्या शेराची अतिप्राथमिक आवृत्ती वाटते. खालची ओळ वृत्तात बसत नाही.

किती जाहले मग्न मी देवळात
तरी चित्त माझे प्रपंचात होते!
ठीक. वरच्या ओळीतला त गुरू म्हणून खास नाही बुवा.

कशाला तयारी नव्याने लढाया ?
भले का कुणाचे विनाशात होते!
चांगला शेर. पण लढाया तयारी नाही. लढायची तयारी.

करा हात ओला, तसे काम होते
 बघा नाव त्यांचे, पुढाऱ्यात होते
धोबीपछाड शेर. घ्यायचा म्हणून घेतल्यासारखा.