याला काय म्हणावे?
लोक काय म्हणतील याची भीती. आपला नवरा आपल्यापेक्षा वरचढ दिसावा, घरकामासारख्या हलक्या कामांत त्याने गती दाखवू नये अशी पारंपारिक महिलावर्गाची इच्छा.
नव्या पिढीतल्या मुलींची मानसिकताही बदलली असेल
निदान शहरातल्या मुलींचीतरी बदलली आहे असे मला वाटते. "माझ्या नवऱ्याला त्याच्या आईने चांगले वळण लावले आहे, व्यवस्थित स्वयंपाक शिकवला आहे", वगैरे बोल मैत्रिणीमध्ये नेहमीच ऐकू येतात.
इथे केंब्रिजात राहणाऱ्या माझ्या मित्रमैत्रिणींमध्ये जोडपी मिळूनच स्वयंपाक करतात असे मला दिसते. त्यातही मित्र हे मैत्रिणींपेक्षा ज्येष्ठ (!) असल्याने जास्त अनुभवी पाककलाकार आहेत असेही दिसते.