गोष्टीतील इतर न लिहीलेली कारणे माहिती नाहीत पण एक कारण हेही असावे की नवऱ्याने स्वयंपाकघरात (स्वतःच्या आवडीने बरं का!बायकोने स्त्रीमुक्ती म्हणूने  कामे सांगून नाही) लक्ष घातलेले घरातील ज्येष्ठ स्त्री घटक उदा. सासू, बायकोची स्वतःची आई यांना आवडत नाही. (बाई घरात असताना तुला स्वयंपाकात लक्ष घालावे लागते? नवऱ्याची बायको, शरम कर!!भगवान से डर!! असे.) 'नवऱ्याने स्वयंपाक केला??हिला स्वत: काही व्यवस्था करता आली नाही कोणाकडून?काय बाई आहे का भिताड??' आदी उद्गार ऐकावे लागतील अशा काल्पनिक भीतीने बायकोने 'सासूबाइंनीच याना शिकवले होते' किंवा 'नणंद आली होती' असे सावध पवित्रे घेतले असावे असे वाटते. चूक बरोबर वा कथेतील इतर कारणॅ वा पात्रांचे स्वभाव माहिती नाहीत.