मृदुला म्हणतात त्याप्रमाणे लोकापवाद हेच कारण अधिक सयुक्तिक वाटते. प्रमिलाचे सोडाच, पण प्रमोदचा दुजोरा यासंदर्भात अधिक महत्त्वाचा वाटतो. जेव्हा गरज पडेल तेव्हा बायकोला मदत केली, तरी लोकांसमोर मात्र आपली अशी प्रतिमा येऊ नये असाच त्याचा प्रयत्न असावा असे वाटते. 'लोकापवादो बलवान मतो मे' हे रामापासूनच चालत आलेले आहे.