आपली तळमळ खरोखर कौतुकास्पद आहेच याविषयी मला मुळीच शंका नाही.मी त्या हेतूनेच मराठीत पुस्तक लिहिण्याचा उपद्व्याप केला.त्या पुस्तकाचे नाव `शक्तिसंयंत्रे त्यावर लेखकाचे नाव श्या̱. ग.कुलकर्णी  (म्हणजे माझे नाव )आणि ते नागपूर येथील महाराष्ट्र विद्यापीठ ग्रंथनिर्मिती मंडळाने प्रकाशित केले आहे.कोणत्याही अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या किंवा शासकीय ग्रंथालयात कदाचित वाळवी लागलेल्या अवस्थेत आपल्याला पहायला मिळेल.मी याच हेतूने सृष्टिज्ञान,विज्ञानयुग या मासिकातून शास्त्रीय विषयावर लेखनही केले आहे पण तेव्हाही प्रतिशब्द शोधताना मला हीच अडचण भासली.