कॉ. विकी,
जर मी मांडलेल्या एकाही मुद्द्याला उत्तरे देण्याऐवजी तुम्ही त्याला बरळणे म्हणत असाल तर तुमच्याकडे उत्तरे नाहीत हे स्पष्ट आहे. अशा परिस्थितीमध्ये पुढील चर्चा (याला चर्चा म्हणणे म्हणजे जरा उदारपणाचे होते आहे) व्यर्थ आहे.
निनाद२९
१. हो. मला काही वर्षांपूर्वी अपघात झाला होता, तेव्हा मदत करण्याऱ्यामध्ये परप्रांतीयही होते.
२. प्रश्न कळाला नाही.
३. माझ्या मते कुणीही कुणाशीही उर्मटपणे वागू नये. पण कधी कधी साधी चर्चाही नीट करणे अशक्य असते हे वरील काही प्रतिसादांवरून दिसून येईल.
मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे. बॉलीवूडपासून सर्व मोठ्या आर्थिक उलाढाली मुंबईत होतात. अशा परिस्थितीमध्ये परप्रांतियांनी मुंबईत येऊ नये असे म्हणणे योग्य नाही. दुसरा मुद्दा मराठी माणसांच्या धंद्याचा. धंदा ही एक कला आहे, त्यासाठी 'बिझनेस सेन्स'ची आवश्यकता असते. साधारणपणे मराठी माणसे ह्या बाबतीत मार खातात. (मा.शंतनूराव किर्लोस्करांसारखे अपवाद सोडल्यास.) पुण्यातील दुकानदारांबद्दल खुद्द पुलंनीच बरेच लिहीले आहे. जर आपण धंद्यात मागे आहोत तर का? हे आत्मपरीक्षण करण्याऐवजी दंडूकशाही वापरून मराठी माणसाची धंद्यात भरभराट होईल असे मानणे पोरकटपणाचे आहे. "ग्राहकांचा संतोष हेच आमचे ध्येय" अश्या नुसत्या पाट्या लावून धंदा होत नसतो. त्यासाठी परिश्रम करावे लागतात. तुमची सेवा चांगली असेल तर ग्राहक आपोआप तुमच्याकडे येतील, त्यासाठी बळजबरीची आवश्यकता रहाणार नाही.
हॅम्लेट