. एका यःकश्चित पुरुषाने शिजवलेले कदान्न खायची वेळ आपल्या सखीवर आलेली पाहून त्यांची कोमल हृदये विदीर्ण होऊन जात व या अवस्थेतून तिची लवकरात लवकर मुक्तता व्हावी अशा शुभेच्या देऊन जाता जाता बल्लवाचार्य प्रमोदकडे एक जळजळीत दृष्टीक्षेप टाकून त्या घरी जात. सुरुवातीला अंगात त्राणच नसल्यामुळे प्रमिला नुसतेच "हां", "हूं" करीत असे. अंगात थोडी ताकत आल्यावर "त्याचं काय झालं, माझ्या नणंदेचं जरा लवकर लग्न होऊन ती सासरी गेल्यावर सासूबाई घरी एकट्याच पडल्या होत्या. म्हणून कधी गरज पडली तर त्या आमच्या ह्यांनाच मदतीला बोलवायच्या. असं थोडं थोडं करीत त्यांनी ह्यांना सगळा स्वैपाक शिकवला हो." असा खुलासा देऊ लागली.
कोणत्याही काळातील आणि संस्कारातील स्त्रियांना अशा अवस्थेत असणाऱ्या आपल्या सखीसाठी तिचा नवरा राबतोय हे पाहून त्याचे कौतुकच वाटायला हवे आणि येथे मात्र त्या त्याच्याकडे जळजळीत कटाक्ष टाकून जात असल्याचे आश्चर्य वाटते.तो शिजवीत असलेले कदन्न होते हे काय त्यानी वासावरूनच ओळखले की काय ? शिवाय त्यावेळेपर्यंत प्रमोदला पदार्थ मनासारखे बनवता येऊ लागले होते असा उल्लेख कथेत केला आहे अशा सख्याना कसलाही खुलासा देण्याचे प्रमिलाला काही कारण आहे असे वाटत नाही.कथा घडलेली असली तरी त्यातील प्रमोद सोडून बाकी पात्रे अशी का वागली कळत नाही.फक्त प्रमोदच्या वागण्यात अथपासून इतिपर्यंत सुसंगति आढळते आणि आपल्यावरील प्रसंग आपल्या आर्थिक आणि शारीरिक कुवतीनुसार योग्य प्रकारे निभावून नेण्याचा प्रयत्न करणे आणि तरीही त्याचे श्रेय न मिळाल्याचेही वैषम्य वाटून न घेणे हे त्याच्या वागणुकीतुन दिसते.